पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल शिरपूर येथे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी.

स्री शिक्षणाचे प्रणेते व थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल व न पा शाळा क्रं १ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. आज महात्मा फुले जयंती चे औचित्य साधून न.पा शाळा क्रमांक 1 व 7 च्या विद्यार्थ्यांची शाळा भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी लहान विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनाचे खेळ, मैदानी खेळ कृतियुक्त अध्यापन व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या महात्मा फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त श्रीमती जे एन महाजन या होत्या. कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के पी कुलकर्णी उपमुख्याध्यापक श्री ए एस कानडे पर्यवेक्षक श्री के एन काजी अधिक्षक श्री जे बी जाधव जेष्ठ शिक्षिका श्रीमती एस जी वाडीले श्री एस एस पावरा, श्री सतिश पिंगळे,श्री एच एम माळी,श्री पी बी वारूळे,श्री जी एस पावरा, श्री जे जी महाजन, श्री एस एन कोळी श्री एस डी माळी श्री एच के पाटील श्री बी ए मोरे श्री ए के गुजर श्री डि एच राजपूत श्री ए एच कोळी श्रीमती पी के पाटील श्रीमती पी आर राजपूत श्रीमती एन यु माळी या उपस्थित होत्या
सुरुवातीला क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात.न.पा.शाळा क्र १ चे इ ४ थी चे विद्यार्थी जिग्नेश पाटील व चेतना वाडिले एम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून सर्वांची मने जिंकली.इ ८ वी चा विद्यार्थीनी कु.जान्वही राजपूत व प्राची करसकर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित आधारित भाषण केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के पी कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले तर अध्यक्षीय भाषणात श्रीमती जे एन महाजन यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात उज्वल यश संपादन करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री वाय एन गिरासे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post